पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी देत अमळनेर शहरात महिलेवर अत्याचार
अमळनेर (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : अमळनेर शहरातील विवाहित महिलेवर पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात 52 वर्षीय आनंदा पाटील (रा. अमळनेर) याच्याविरुद्ध बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
असे आहे प्रकरण
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, 2 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता पीडित महिला घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरी आला. यावेळी महिलेने त्याच्या वारंवार घरी येण्याबाबत विचारणा केली असता, आरोपीने तिच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आहे. या धमकीनंतर आरोपीने महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.गेल्या दोन वर्षांपासून आरोपी वारंवार फोन करून धमकावत असल्याचे नमूद आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
