चुंचाळेजवळील गायरान येथे गरोदर महिलेचा चक्कर कोसळल्याने मृत्यू


यावल (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील चुंचाळे येथून सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गायरान आदिवासी वस्तीवरील पाच महिन्यांची गरोदर 26 वर्षीय विवाहिता रविवारी सकाळी चक्कर येऊन घरात कोसळली. तिला तातडीने तेथून यावल ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.

काय घडले विवाहितेसोबत ?
चुंचाळे, ता.यावल या गावापासून सातपुड्याच्या दिशेने गायरान ही आदिवासी वस्ती आहे. या आदिवासी वस्तीवरील रहिवासी सुरेखा दिनेश बारेला (26) ही विवाहिता पाच महिन्याची गरोदर होती. तिला दोन दिवसांपासून त्रास जाणवत होता आणि शनिवारी रात्री देखील तिला त्रास होत असताना सकाळी रुग्णालयात जाऊ, असा निर्णय कुटुंबाले घेतला होता. दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सदर विवाहितेला चक्कर आले आणि ती जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडली. तातडीने तिला तेथून औषध उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले.







याप्रकरणी यावल पोलिसात दिनेश मोहन बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विवाहितेचा मृत्यू कशामुळे झाला हे जाणून घेण्याकरिता तिच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !