किनगावातील दगडफेक प्रकरण : 16 संशयीतांना जामीन
यावल (रविवार, 8 नोव्हेंबर 206) : यावल तालुक्यातील किनगाव येथे विजयादशमीनिमित्ताने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या पथसंचलनास एका धार्मिक स्थळासमोरून नेण्यात विरोधावरून पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी 16 संशयीतांना अटक करण्यात आली होती. या संशयीतांनी भुसावळातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन दिला. 25 ऑक्टोंबरला घटना घडल्यानंतर संशयीत तुरुंगात होते.
काय आहे प्रकरण ?
किनगावात चुंचाळे रोडावर एका धार्मिक स्थळासमोरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास विरोध दर्शवतांना रस्ता अडवण्यात आला. समुदायास बळाचा वापर करून रस्त्यावरून हटवतांना झालेल्या दगडफेकीत एका पोलीस उपनिरीक्षकासह सात जण जखमी झाले तर या गुन्ह्यात 16 संशयीतांना अटक करण्यात आली. या सर्व 16 जणांची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. दरम्यान, शनिवारी भुसावळातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात या सर्व 16 संशयीत आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली.








या संशयीतांना मिळाला जामीन
हारुण नसीर पिंजारी, अक्षय संतोष साळुंखे, भूषण शिवाजी साळुंखे, इरफान खान शेर खान, आजीम शेख कलिम, अल्ताफ कडू पिंजारी, कलीम शकील पिंजारी, आसीफ मुस्ताक खाटीक, समीर खान शकील खान, वसीम खान अयूब खान, रियाज राजु तडवी, समीर खान युनूस खान, शेख जावीद शेख कलीम, इम्रान फारुख बागवान, रहीम शहा रमजान शहा फकीर व भिकारी उर्फ बबलु निसार खाटीक या 16 जणांना जामीन मंजूर करण्यात आला.