भुसावळातील एमडी ड्रग्ज प्रकरण : चौघा संशयीतांची पोलीस कोठडीत रवानगी


भुसावळ (रविवार, 8 नोव्हेंबर 206) : भुसावळातील किन्ही एमआयडीसी परिसरात 62.21 ग्रॅम एमडीसह भुसावळसह कंडारीतील चौकडीला अटक करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणी अटकेतील पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

चौघा संशयीतांना सुनावली कोठडी
भुसावळ तालुका पोलिसांनी गुरुवारी पहाटे 2.55 वाजता किन्ही एमआयडीसी परिसरात छापा टाकून ही कारवाई केली होती. यात 62.21 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडरसह दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल असे एकूण सात लाख 28 हजार 840 रुपयांचे साहित्य जप्त केले होते. या प्रकरणी ऋषभ खेडकर (8), प्रथमेश आव्हाड (27), शेख अफजल (26) आणि असगरखान अनवरखान (57) यांना अटक केली आहे. या कारवाईत असगरखान याच्याकडून सर्वाधिक 55.33 ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आले तसेच जप्त केलेल्या चार मोबाईलमधील संपर्क क्रमांक, संदेश आणि अन्य डिजिटल पुराव्यांच्या आधारे संभाव्य पुरवठादार व ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !