अकलूद गावाजवळ दुचाकीला टँकरची धडक : भुसावळातील दुचाकी चालक जखमी


यावल (रविवार, 8 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळ भुसावळ-फैजपूर रस्त्यावर दुचाकीला टँकरवरील अज्ञात चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातामुळे मोटरसायकलचे देखील नुकसान झाले. अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात टँकरवरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चालक अपघातात गंभीर
भुसावळ-फैजपूर रोडवरील अकलूद गावाजवळ मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 ई.डब्ल्यू. 5610) घेऊन दिलीप बापूराव वाघ (खडका, भुसावळ) हे जात होते. त्यांना टँकर क्रमांक एम. एच. 41 यु. 3774 वरील अज्ञात चालकाने जवळ धडक दिली या अपघातामध्ये ते जखमी झाले आणि त्यांच्या मोटरसायकलचे देखील नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक तेथून पसार झाला. या अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिलीप वाघ यांच्या फिर्यादीवरून टँकरवरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !