जळगावात गॅरेजमध्ये आलेल्या रुग्णवाहिकेला अचानक आग
जळगाव (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026) : जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील खेडी शिवार परिसरात सोमवार, 9 दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास 108 रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याची आगली. सोहेल पाटील यांनी अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाने धाव घेत आग विझवली. आगीचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.
दुरुस्तीसाठी वाहन आल्यानंतर आग
108 रुग्णवाहिका गॅरेजमध्ये कामासाठी आणली असताना अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.








मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, केंद्रप्रमुख अधिकारी भारत बारी, वाहनचालक देविदास सुरवाडे तसेच फायरमन नितीन ससाणे आणि खुशाल सपकाळे यांनी आग विझविण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.