जळगावात मुलाला वाचवताना आईचाही विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू


जळगाव (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : विद्युत तारेचा जबर धक्का मुलाला बसल्यानंतर त्यास वाचवण्यासाठी सरसावलेल्या आईचादेखील मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना जळगाव शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात मंगळवार, 17 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. राहुल सपकाळे (35) असे मयत तरुणासह सुनंदा सपकाळे असे मृत आईचे नाव आहे.

तार कट करताना जबर शॉक
सपकाळे यांच्या घराजवळ विद्युत तार तुटून पडल्याने तो कट करण्यासाठी राहुल हा तरुण गेल्यानंतर त्यास जबर विजेचा जोरदार धक्का बसला. मुलाला विजेचा धक्का बसल्याचे पाहताच त्यास वाचवण्यासाठी आई सुनंदा सपकाळे यांनी धाव घेतली मात्र या प्रयत्नात त्यांनाही विजेचा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत आई आणि मुलगा अशा दोघांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नातेवाईकांचा आक्रोश
घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती राहुल सपकाळे आणि सुनंदा सपकाळे या दोघांनाही मृत घोषित केले. आई आणि मुलाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची बातमी समजताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज हेलावून टाकणारा होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !