सहावी ते आठवीच्या सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळणार ! सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय !
भुसावळ (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत शिकविणार्या सरसकट सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी द्यावी, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. त्यास महाराष्ट्र शासनाने विशेष अनुमती याचिका क्र.57397/26 दाखल करून आव्हान दिले मात्र 18 नोव्हेंबर 26 रोजी सदर याचिका फेटाळली गेल्याने राज्यातील हजारो पात्र शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळणार असल्याची माहिती भुसावळातील शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी कळवली आहे.
कायदेशीर अडथळे दूर
समान काम-समान वेतन ह्या तत्वानुसार हा निर्णय असल्याबद्दल सहावी ते आठवीपर्यंत पदवीधर शिक्षकांना 25:75 सूत्रानुसार मिळत असलेली वेतन श्रेणी आता सर्व सरसकट पदवीधर शिक्षकांना ही उच्च वेतन श्रेणी मिळण्यात सर्व कायदेशीर अडथळे दूर झाले असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्र.ह.दलाल यांनी दिली.
