भुसावळातील मॅसानिक लॉज प्रकरणी तहसीलदारांचे सह दुय्यम निबंधकांना आदेश


भुसावळ (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : भुसावळ शहरातील मॅसानिक लॉज प्रकरणात इतर मिळकती व्यवहार होवू नये तसेच मिळकती प्रतिबंधित करण्यात याव्या, आपल्या स्तरावरून नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी, असे आदेश भुसावळ तहसीलदारांनी सह दुय्यम निबंधकांना दिले आहेत. भुसावळचे माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी या संदर्भात तक्रार केली हेाती.

केदार सानप यांची तक्रार
शहरातील मॅसानिक लॉज तसेच इतर मिळकती संदर्भात तथाकथीत कागदपत्रांच्या माध्यमाने खरेदी व विक्री होणारे अनाधिकारी व बेकायदेशीर व्यवहारापासून सर्व सामान्य जनतेस सावध राहण्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी तक्रार दिली होती. यावर सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी चौकशी करून तहसीलदार भुसावळ यांनी मिळकतीचे अभिलेख तपासून शर्त भंग झाला असल्यास पुढील कार्यवाही करावी व तहसीलदार भुसावळ यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत वाद मिळकत व मॅसेनिक लॉजच्या इतर मिळकतीचे व्यवहार होवू नये यासाठी सदर मिळकती प्रतिबंधीत करण्यात याव्या, असे आदेश दिलल होते.

तहसीलदारांनी काढले आदेश
याबाबत कोणतीही अंमलबजावणी केली नसल्यामुळे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला व यानंतर भुसावळ तहसीलदारांनी दखल घेत मॅसानिक लॉज इतर मिळकती व्यवहार होवून नये सदर मिळकती प्रतिबंधित करण्यात याव्या, आपल्या स्तरावरून नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी, असे आदेश सह दुय्यम निबंधकांना दिले असल्याची माहिती सानप यांनी माध्यमांना दिली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !