शिविगाळ केल्याच्या वादातून बोरनारला तरुणाचा खून : पाच आरोपींना अटक


जळगाव (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसोहळ्यादरम्यान झालेल्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. प्रेम गोपाल धनगर (23, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृताचे नाव असून ही घटना बुधवार, 18 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजता घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली.

वादानंतर झाला खून
मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रेम धनगर हा अमळनेर येथे वास्तव्यास होता, तर त्याचे आई-वडील बोरनार येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच प्रेम हा आपल्या गावी बोरनार येथे आला. बुधवारी सायंकाळी तो गावातील एका लग्नसोहळ्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याचा शिविगाळ केल्याच्या कारणावरून संशयीतांसोबत वाद झाला. हल्लेखोरांनी प्रेम याला उद्देशून आज ईसको जिंदा नही छोडेंगे म्हणत त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रेम याचा जागीच मृत्यू झाला.

पाच आरोपींना अटक
तरुणाच्या खून प्रकरणी सुनील नारायण धनगर (38, बोरनार) यांच्या फिर्यादीवरून अनिस अजीज पटेल (45, बोरनार), आदील अजीज पटेल (32, बोरनार), सादीक मुर्शीद पठाण (28, बोरनार), शोएब ईस्माईल पटेल (32, नाचणखेडा), अशपाक मेहमूद पटेल (27, यावल) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. तपास एमआयडीसी निरीक्षक बबन आव्हाड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !