लग्नाच्या आमिषाने पाचोरा शहरातील तरुणीवर अत्याचार : त्र्यंबकेश्वरच्या आरोपीविरोधात गुन्हा


भडगाव (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : लग्न करण्याच्या आमिषाने पाचोरा शहरातील एका भागातील 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मनोहर देवराम खोटरे (हिरडी, रोहिळे, त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक) या तरुणाविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉटेलवर नेत अत्याचार केल्याचा आरोप
24 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत मनोहर खोटरे या तरुणाने लग्न करण्याचे आमिष देत पीडीतेला भडगाव शहरातील दादाजी हॉटेल (लॉज) मध्ये नेत तरुणीच्या इच्छेविरोधात अत्याचार केला तसेच फोटो व रेकॉर्डींग करीत ते व्हायरलची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. अत्याचाराची घटना 8 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !