भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्व.इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात


भुसावळ (शनिवार, 20 नोव्हेंबर 2026) : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी के.नारखेडे विद्यालयाच्या सकाळ व दुपार अशा दोन्ही शाखांमध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विद्यालयात स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सकाळ शाखेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल व पर्यवेक्षक एस.एल.राणे यांनी तर दुपार शाखेत मुख्याध्यापिका संगीता अडकमोल व उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दोन्ही शाखांमध्ये राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त एकात्मता, बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि देशाच्या अखंडतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ वाचन करण्यात आले. दुपार शाखेत एस.एन.राणे यांनी स्व.इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देत त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर व देशासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. सकाळ शाखेत सूत्रसंचालन व शपथवाचन विद्यालयाचे उपशिक्षक एस.पी.झांबरे यांनी केले.

या कार्यक्रमास दोन्ही शाखांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संगणक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, देशाची एकता व अखंडता जपण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !