साकळीत वरणगाव-श्री क्षेत्र मनुदेवी येथे जाणार्‍या पदयात्रेचे स्वागत


यावल (शनिवार, 20 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील साकळी येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही वरणगाव ते श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर, आडगाव येथे जाणार्‍या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील यांच्या वतीने स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

आलेल्या भाविकांकरीता येथे अल्पोहार व चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच येथे रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील यांना आरती करण्याचा मान देण्यात आला. साकळीकर, पाटील परिवार, मित्र परिवारातर्फे सर्व भक्तांचे स्वागत करण्यात आले. साकळी येथे काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पदयात्रा आई मनुदेवी मंदिराकडे मार्गस्थ झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !