राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत भुसावळच्या हर्षा सपकाळेची कांस्य पदकाला गवसणी !


भुसावळ (शनिवार, 20 नोव्हेंबर 2026) : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने सांगली येथे 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भुसावळच्या हर्षा सपकाळे हिने कांस्यपदक पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तिच्या या यशामुळे भुसावळच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

हर्षा सपकाळे ही छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी, भुसावळ येथे नियमित सराव करते. राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळविल्यामुळे तिला क्रीडा क्षेत्रातील पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तिच्या या यशामुळे भविष्यात क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

हर्षाच्या यशामागे अकॅडमीचे प्रशिक्षक धीरज सोनवणे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि मेहनत महत्त्वपूर्ण ठरली. तसेच बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र अरुण मोरे यांचेही तिला मार्गदर्शन लाभले.

यापुढेही हर्षा सपकाळे भुसावळ शहराचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी येथे सराव सुरू ठेवणार आहे. तिच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि विविध स्तरांतून तिचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !