धुळे जिल्ह्यातील तरुणाचा मारहाणीत मृत्यू : धरणगावातील संशयीताला अटक


धरणगाव (रविवार, 22 नोव्हेंबर 2026) : घराबाहेर पडलेली लाकडी बल्ली उचलण्याच्या किरकोळ वादातून संशयीताने लोखंडी रॉड मारल्याने धुळे जिल्ह्यातील विंचूरच्या 39 वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना धरणगाव शहरातील संजय नगर भागात घडली. किरण धनराज बोरसे (39, विंचूर, ता.धुळे) असे मृताचे नाव आहे.

असे आहे खून प्रकरण
धरणगाव पोलिसात सुनंदा मनोज महाजन (39, अनोरा, ता.धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किरण बोरसे यांनी लाकडी दांटी बल्ली संशयीत अजय रमेश मोरावकर (संजयनगर, धरणगाव) यांच्या घराबाहेरून उचलल्याच्या रागातून आरोपीने लोखंडी रॉडने पायावर मारहाण केली. हल्ल्याची ही घटना गत महिन्यात 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता घडली. या हल्ल्यात बोरसे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जळगाव सिव्हीलमध्ये उपचार करण्यात आले मात्र उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी धरणगाव पोलिसांना कागदपत्रे मिळाल्यानंतर शनिवार, 21 रोजी आरोपी अजय रमेश मोरावकर विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक शांताराम महाजन करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !