भुसावळातील रीगल ड्रेसचे मालक धरमचंदजी मुगदिया यांचे निधन : उद्या अंत्ययात्रा


भुसावळ (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : शहरातील मातृभूमी चौक, प्रोफेसर कॉलनी भागातील ‘धरमप्रेम’ निवासमधील रहिवासी व प्रसिद्ध रीगल ड्रेसचे मालक धरमचंदजी सरुपचंदजी मुगदिया (89) यांचे सोमवार, 23 रोजी दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, 24 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघेल. ते भुसावळातील रीगल ड्रेस व गारमेंटचे संचालक विनोद व संजय मुगदिया यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, नातू व पणतू व सुना असा मोठा परिवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !