जळगावात मोटारसायकल चोरट्यांचा पर्दाफाश ; एमपीतील चोरट्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त

जळगाव शहर व स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : जिल्हापेठचे दोन तर शहरचे सात गुन्हे उघडकीस


जळगाव (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : जळगाव शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दुचाकी चोरी करणार्‍या मध्यप्रदेशातील सराईत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून एकूण नऊ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. गोकुळ साहेबराव पाटील (45, बोरसर, ता.बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेने शहर हद्दीतील सात तर जिल्हापेठ हद्दीतील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगावच्या बळीराम पेठ परिसरातील गोपाल स्टेशनरी समोरून दुचाकी (एम.एच.19 ई.एम.2330) चोरीला गेली. या प्रकरणी 30 ऑक्टोबर 2026 रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासात गोकुळ साहेबराव पाटील (45, बोरसर, ता.बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) याचे नाव कळताच त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून जळगाव शहरातून चोरी केलेल्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईत जळगाव शहर पोलीस ठाण्यातील सात आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील दोन अशा एकूण आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची किंमत दोन लाख 32 हजार 500 रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, जळगाव शहर निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार प्रवीण भालेराव, हवालदार मुरलीधर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप सपकाळे, हवालदार विजय पाटील, हवालदार अक्रम शेख, हवालदार किशोर पाटील, कॉन्स्टेबल छगन तायडे, कॉन्स्टेबल राहुल रगडे, कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे, कॉन्स्टेबल रिजवान शेख, हवालदार विरेंद्र शिंदे, हवालदार सतीश पाटील, कॉन्स्टेबल अमोल ठाकूर, कॉन्स्टेबल प्रण पवार, कॉन्स्टेबल कुंदनसिंग बयास, कॉन्स्टेबल मुबारक देशमुख, कॉन्स्टेबल विकास पवार, कॉन्स्टेबल हर्षल महाजन, गौरव पाटील, मिलिंद जाधव आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !