मध्य रेल्वे द्वारा महापरिनिर्वाण दिन 2026 निमित्त अनारक्षित विशेष गाड्या धावणार !


भुसावळ (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेतर्फे नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर तसेच अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) एकेरी विशेष गाड्या
विशेष गाडी क्रमांक 01260 दिनांक 04 डिसेंबर रोजी नागपूर येथून 6.10 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 10.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक 01262 दिनांक 04 रोजी नागपूर येथून 11.55 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 4.15 वाजता मुंबई येथे पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01264 दिनांक 5 रोजी नागपूर येथून 7.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.55 वाजता मुंबई येथे पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक 01266 दिनांक 5 डिसेंबर 2026 रोजी नागपूर येथून 6.10 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 10.55 वाजता मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर स्थानकावर थांबा असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष गाड्या
विशेष गाडी क्रमांक 01249 दिनांक 06 डिसेंबर रोजी मुंबई येथून 8.25 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 11.20 वाजता नागपूर येथे पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01253 दिनांक 07 डिसेंबर रोजी दादर येथून रात्री 12.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 4.10 वाजता नागपूर येथे पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01251 दिनांक 07 डिसेंबर 2026 रोजी मुंबई येथून 10.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 12.55 वाजता नागपूर येथे पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01255 दिनांक 7 डिसेंबर 2026 रोजी मुंबई येथून 12.35 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी तीन वाजता नागपूर येथे पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक 01257 दिनांक 8 डिसेंबर रोजी मुंबई येथून 12.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 4.10 वाजता नागपूर येथे पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अनारक्षित विशेष गाडी
विशेष गाडी क्रमांक 01218 दिनांक 05 डिसेंबर रोजी अमरावती येथून 5.45 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 5.25 वाजता मुंबई येथे पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01217 दिनांक 07 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून 12.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.50 वाजता अमरावती येथे पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई).


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !