आसारी चोरटे नशिराबाद पोलिसांच्या जाळ्यात : 1.28 लाखांचा मुद्देमाल जप्त
नशिराबाद (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : शहरात बांधकाम स्थळावरून आसारी चोरी करणार्या चौघांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करीत त्यांना अटक केली. न्यू इंग्लिश स्कूलसमोरील जलकुंभाच्या बांधकामस्थळावरून बांधकामासाठी आणलेली आसारी चोरी झाली होती. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली.ी
गुन्हा दाखल होताच पडल्या बेड्या
नशिराबाद शहरातील न्यू इंग्लिश स्कूलसमोर जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर लोखंडी आसारी आणण्यात आली होती मात्र बांधकामस्थळावरून ही आसारी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला होता. गोपनीय माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेत सापळा रचला. त्यानुसार चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांकडून चोरीची सुमारे 400 किलो आसारी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मालवाहू रिक्षा जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत एक लाख 28 हजार रुपये आहे.
या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये गिरीश भागवत खैरनार (रा.कृष्ण मंदिराजवळ, नशिराबाद), पवन किशन कोल्हे (रा.नशिराबाद), तुषार दीपक चौधरी (रा. नशिराबाद) आणि सुमित चेतनसिंह महाजन (रा. नशिराबाद) यांचा समावेश आहे. चारही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नशिराबाद प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार आणि गणेश गायकवाड यांच्या पथकाने केली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.
