भांडण सोडवताना भडगावात पोलीस कर्मचार्‍याला धक्काबुक्की : चौकडीविरोधात गुन्हा


भडगाव (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : शहरातील पारोळा चौफुली भागात चहाच्या टपरीसमोर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या भडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यालाच आरोपींनी धक्काबुक्की करीत शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दोघांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले भडगावात ?
भडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी ललित ईश्वर पाटील यांच्या फिर्यादीनुसार, 22 रोजी सकाळी 9.20 वाजता भडगाव शहरातील पारोळा चौफुली भागातील चहा टपरीसमोर संशयीत भांडण करीत असताना ते वाद मिटवण्यासाठी गेल्यानंतर संशयीतांनी शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करीत हाता-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच मानेला दाबून मारहाण करीत ईजा निर्माण केली. या प्रकरणी सद्दाम उर्फ रईस अब्दुल हमीद व इनेश उर्फ बबलू प्रल्हाद पवार, वसीम जाकीर शेख, अशफाक अलताफ (सर्व रा.भडगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !