न्हावी येथे 30 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
यावल (गुरुवार, 26 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील न्हावी गावातील पाटील वाडा भागातील रहिवासी एका तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. 30 वर्षीय तरुणांनी वायरच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जखमी तरुणाचा मृत्यू
न्हावीतील पाटील वाडा भागातील रहिवासी कुंदन पांडुरंग चोपडे (30) हा तरुण आपल्या घरी असताना त्याने आपल्या राहत्या घराच्या वरील रूममध्ये लोखंडी हुकला वायर बांधून गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहे.
