कराटे स्पर्धेत भुसावळातील हिंदी महाविद्यालयास सुवर्ण व रौप्य पदक
भुसावळ (गुरुवार, 26 नोव्हेंबर 2026) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कराटे स्पर्धेत श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयाची प्रथम वर्ष बी.कॉमची विद्यार्थिनी मंतशा आनमने कराटे स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. तिला नागपूरचे पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याहस्ते मेडल देवून गौरवण्यात आले
बी.ए.प्रथम वर्षाचा विद्यार्थी हरतीश लोढेने रौप्य पदक पटकावले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व उज्वल भविष्या साठी शुभकामना दिल्या. प्राचार्य डॉ. रमेश जोशी व प्रा.अनुपम शर्मा यांनी खेळाडूंना बहुमूल्य मार्गदर्शन दिले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, डॉ.किशोर चौधरी, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.शिवा खान, प्रा.समता तायडे, प्रा.हेमांगी कोळी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
