धुळ्यातील गोरक्षकावर झालेल्या हल्ल्याची व्हावी चौकशी : यावल तहसीलदारांना निवेदन


यावल (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : यावल तहसील कार्यालयामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे. यात त्यांनी असंवैधानिक कृत्य करणार्‍या धुळे महापौर यांचा तत्काळ राजीनामा घेऊन गोरक्षक संजय शर्मा यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या जिल्हा कार्यालयाची तोडफोड करणार्‍यांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

भुसावळ तहसीलदारांना निवेदन
भुसावळ तहसील कार्यालयामध्ये शुक्रवारी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. धुळे शहरांमध्ये काही दिवसापूर्वी गोरक्षक संजय शर्मा यांच्या निवासस्थानी धुळ्यातील महापौरांच्या गुंडांमार्फत हल्ला करण्यात आला होता. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हा कार्यालयाची तोडफोडदेखील करून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते. ही घटना अत्यंत गंभीर असून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे. या घटनेमुळे धुळे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात राहणार्‍या नागरिकांमध्ये गोरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र संतांची लाट निर्माण झाली आहे.

या प्रकरणाची पोलिसात एफआयआर दाखल झाल्याची माहिती असून हल्ल्यात सहभागी झालेल्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये. धुळे येथील महापौरांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा व या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापौर यांचे चिरंजीव व त्यांच्या गुंडामार्फत झालेल्या हल्ल्याची जवाबदारी निश्चित करत धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा घ्यावा, गोरक्षक संजय शर्मा यांच्यावरील दाखल प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध खोट्या आरोपाची तात्काळ कायदेशीर सुटका करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देतेप्रसंगी सागर लोहार, कमलेश शिर्के, चंदन फेगडे, सुरज धनंजय, लोकेश चौधरी, धीरज भोळे, हेमंत कोळी, प्रणव पाटील, सागर कोळी, योगेश कोळी, सौरव पाटील, पृथ्वीराज भोई, अक्षय पाटील, हेमंत कोळी, विवेक पाटील, मनीष चौधरी, लोकेश किरंगे, सोहम पाटील, श्रीराम बोरसे, वासुदेव भोळेसह आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !