वृक्षांचा ‘वाढदिवस’ साजरा करून पर्यावरणाचा संदेश


युनिटी क्लब, शिवाजी नगर मित्र मंडळाचा पुढाकार

चाळीसगाव : ‘निर्धार हरितक्रांतीचा, वसा वृक्ष संवर्धनाचा’ या मोहीमेंतर्गत शहरातील युनिटी क्लब व शिवाजी नगर मित्र मंडळाच्यावतीने मागील वर्षी हिरापूर रोडवरील छत्रपती शिवाजीनगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. वर्षभरात वृक्षांनी चांगलाच आकार घेतला. या वृक्षांचा पहिला वाढदिवस साजरा करुन वृक्षप्रेमींनी पर्यावरण बचावचा संदेश दिला. यंदाच्या पावसाळ्यातही युनिटी क्लबने रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे.

पर्यावरणाचे संवर्धनासह वृक्षांच्या संगोपनाची गरज
वृक्षारोपणास वर्षपूर्ती झाल्याने झाडांची पंचारती करण्यात येवून परिसरातील वृक्षांना फुगे लावून सजविण्यात आले होते. वृक्ष हा हरीत वसुंधरेचा प्राण असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी युवकांनी एकजुटीने पर्यावरणाची शान राखत मानवनिर्मित संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण करुन जैवविविधतापूरक वसुंधरा बनवण्यासाठी प्रयत्नांती असायला हवे, असे भगवंतराव काटकर यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणाचे संवर्धन व वृक्षांचे संगोपन करण्याची गरज निर्माण झाली असून पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना करणे काळाची गरज बनली असल्याचे अनिल जाधव यांनी सांगितले.

वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यावर भर : स्वप्नील कोतकर
शहरांचा वाढता विस्तार, वृक्षांची होणारी तोड यामुळे शहरांच्या निसर्गसौंदर्यावर, पर्यावरणावर व हवामानावर याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. अशा परीस्थितीत वृक्ष लागवड केल्याशिवाय गत्यंतर नाही. पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी सामाजिक दृष्टीकोन ठेवून वृक्ष लागवड ही एक सामाजिक चळवळ उभारली जावी म्हणून वृक्षलागवड मोहीम राबविण्यासोबत वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यावर भर दिला असल्याचे स्वप्निल कोतकर यांनी यावेळी सांगितले

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मनिष मेहता, स्वप्निल कोतकर, इशू वर्मा, युवराज शिंपी, भगवंतराव काटकर, अनिल जाधव, किशोर पुरकर, मधुकर पाटील, देविचरण काटकर, कमलेश मोरे, हर्षल देशमुख, दुर्गेश जाधव, किरण सपकाळ, नितीन देवरे, सागर सुर्यवंशी, विनित गवळी, जयवंत जाधव, प्रशांत पुरकर, योगेश जाधव, ज्ञानेश्वर भामरे अजय चव्हाण, शामकांत देशमुख, अजित काटकर, शिवाजी शितोळे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !