जळगावात 13 वर्षीय बालकाची आत्महत्या


जळगाव (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : शहरातील अवघ्या 12 वर्षांच्या एका शाळकरी मुलाने घरात गळफास घेतला. ही घटना शुक्रवार, 11 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता उघडकीस आली. रोहित राहुल चौधरी (13, दूध फेडरेशन रोड, जळगाव, मूळ रा.लक्ष्मी नगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

कुटूंबाने फोडला टाहो
रोहित हा भुसावळातील एका वसतिगृहात राहून सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो जळगावला आपल्या घरी आला. रोहितच्या वडिलांनी नुकतेच शहरातील खडके चाळ भागात एक नवीन घर घेतले आहे. रात्री जेवण झाल्यानंतर रोहित ‘मी नव्या घरात झोपायला जातो’ असे सांगून खडके चाळ येथील घरी गेला मात्र शुक्रवारी सकाळी 11 वाजता रोहितची आई रूपाली या नव्या घरात गेल्या असता रोहितने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आईच्या आक्रोशानंतर शेजार्‍यांनी तातडीने धाव घेत रोहितला जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

रोहितचे वडील राहुल चौधरी हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलाच्या अचानक जाण्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या जळगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !