जळगावात रिजार्ज अपडेटची प्रोसेसने सेवानिवृत्ताला दहा लाखांचा गंडा


जळगाव (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : सायबर भामटे फसवणुकीच्या विविध तर्‍हा काढून गंडवण्याचे प्रकार वाढले आहेत. जळगावातील सेवानिवृत्ताला भामट्याने रिजार्ज अपडेट करायचे असल्याचे व्हॉटसअ‍ॅप कॉलवर सांगून तब्बल दहा लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
तक्रारदार रमेश नारायण पाटील (74, रा.महाबळ, जळगाव) यांना 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. समोरील व्यक्तींनी त्यांना गुगलवर जाऊन ‘रिचार्ज अपडेट’ असे टाइप करण्यास सांगितले. त्यानंतर डेबिट कार्डची महिन्याची व वर्षाची माहिती टाकण्यास सांगून, आता तुमचे रिचार्ज होऊन जाईल, असे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. यानंतर 9 व 10 सप्टेंबर रोजी तक्रारदारांच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यातून नेट बँकिंगच्या माध्यमातून एफडी प्री-मॅच्युअर करून एकूण 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !