भुसावळ मुख्याधिकारीपदी रमाकांत डाके


तत्कालीन अधिकारी करुणा डहाळे कार्यमुक्त

भुसावळ : भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारीपदी कामठी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली करण्यात आली आहे. पालिकेच्या तत्कालीन अधिकारी करुणा डहाळे या 7 जुलैपासून कार्यमुक्त करण्यात आले असल्याचे शासनाचे अवर सचिव सचिन द.सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या 7 जुलै रोजी काढलेन्या आदेशात नमूद केले आहे.

भुसावळ पालिकेला अखेर मिळाले पूर्णवेळ अधिकारी
दरम्यान, शहरात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने करुणा डहाळे यांना तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी सक्तीच्या रजेवर पाठवल्याने शहराचा प्रभारी अधिकार्‍यांकडे पदभार सोपवण्यात आला होता तर पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्याची मागणीदेखील नगरसेवक पिंटू कोठारी यांनी नूतन जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाल्याने शहरातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !