कोरोना : जिल्ह्यात 293 रुग्णांचा मृत्यू : 4803 रुग्णांना बाधा


जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव कायम असून मंगळवारअखेर जिल्ह्यातील चार हजार 803 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 293 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर दोन हजार 828 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात 293 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे तब्बल 293 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 221 रुग्णांचा, गणपती रुग्णालयात पाच रुग्णांचा, उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 40 रुग्णांचा, गोल्ड सिटी हॉस्पीटलमध्ये तीन रुग्णांचा शिवाय पाचोर्‍यात तीन, चोपड्यात दोन, चाळीसगावात दोन रुग्णांचा मृत्यू ओढवला असून 15 रुग्णांचा ब्रॉड डेड झाल्याने मृत्यू झाला आहे.

एकाच दिवसात 11 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासा जिल्ह्यात 11 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. त्यात नऊ रुग्णांचा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दोन रुग्णांचा डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जळगावातील 60 व 70 वर्षीय पुरूषासह 58 वर्षीय महिला, रावेर तालुक्यातील 52 व 65 वर्षीय पुरूषासह 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे तसेच एरंडोल तालुक्यातील 57 वर्षीय पुरूषासह जामनेर तालुकयातील 50 वर्षीय पुरूष तसेच चाळीसगाव तालुक्यातील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !