मुक्ताईनगर नगरपंचायत मुख्याधिकारीपदी अश्विनी गायकवाड
मुक्ताईनगर : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांची पाच महिन्यातच उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांची 6 जुलै रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी नियुक्ती केली असून 6 जुलै पासुन जगदाळे यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमीत करण्यात येणार आहेत.

