अल्पवयीन मुलीचे अपहरण : छायाचित्राद्वारे आरोपीचा कसून शोध


जळगाव : खाऊ देण्याचे आमिष देवून पाच वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना 16 जून रोजी 2019 रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर घडली होती. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे छायाचित्र तसेच रेखाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. संबंधित वर्णनातील संशयित अथवा चिमुकलीबाबत माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.

16 जून रोजी 2019 ची घटना
याबाबत माहिती अशी की, 16 जून 2019 रोजी दुपारी 12.45 वाजता जळगाव रेल्वेस्थानकावर एक तरुण आपल्या पाच वर्षीय मुलीसह आला होता. त्यांना जयपुर येथे जायचे असल्याने फलाट क्रमांक तीनवर ते बसले होते. प्रकृती खराब असल्यामुळे या तरुणास झोप लागली तर याच दरम्यान, संशयिताने त्याच्या पाच वर्षांच्या मुलीस खाऊ देण्याच्या बहाण्याने ताब्यात घेतले. यानंतर तिला सोबत घेवून संशयित गोवा एक्सप्रेसमध्ये बसून रवाना झाला. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. वर्ष उलटूनही मुलीचा शोध लागू शकलेला नाही. गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यातील चिमुकलीला घेवून जाणारा संशयित दिसून येत आहे. त्याचे छायाचित्र तसेच रेखाचित्र जारी करण्यात आले आहे.

चिमुकलीसह संशयिताचे वर्णन असे
अपहरण केलेली मुलगी पाच वर्षांची आहे. तीची उंची 2 फुट 3 इंच आहे. रंग गोरा, नाक सरळ, मध्यम बांधा, डोळे व केस छोटे आहेत. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपहरण करणार्या संशयिताचेही फोटो, रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. संशयित सुमारे 35 ते 40 वयोगटातील आहे. त्यांची उंची 5 ते 6 फुट आहे. रंग सावळा, मध्यम बांधा, नाक सरळ, डोळे मोठे व केस छोटे आहे. हा संशयित अथवा चिमुकलीबाबत काहीही माहिती मिळाल्यास संपर्क क्रमांक 0257 2221790 तसेच 9823019711, 7021502355 या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !