धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे एकाच दिवशी 418 रुग्ण आढळले


जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 8605 वर

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी तब्बल 418 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 8605 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून कोरोनामुळे आतापर्यंत 427 रुग्णांचे मृत्यू ओढवले आहे.

या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 121
जळगाव ग्रामीण 12
भुसावळ 29
अमळनेर 15
चोपडा 45
पाचोरा 18
भडगाव 02
धरणगाव 25
यावल 16
एरंडोल 10
जामनेर 38
रावेर 33
पारोळा 05
चाळीसगाव 44
मुक्ताईनगर 02
बोदवड 03
अन्य जिल्हा 00



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !