भुसावळातील महिलेला अश्लील संदेश : पुण्यातील आरोपीविरुद्ध गुन्हा
भुसावळ : महिलेल्या मोबाईलवर अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी प्रदीप अरुण आढाव (पुणे) याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात विनयभंग व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका महिलेच्या फेसबुक आणि व्हाट्सअप क्रमांकावर पुणे येथील प्रदीप आढाव या आरोपीने अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्यानंतर महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. हा प्रकार फेब्रुवारी ते मे या काळात घडला असून अधिक तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.

