भुसावळ विभागातून बांग्लादेशात कांद्याची वाहतूक
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लासलगाव रेल्वे स्थानकावरून प्रथमच बुधवारी 20 व्हीपी पार्सल गाडीद्वारे बांग्लादेशातील दर्शना स्थानकावर कांद्याची वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वे कोरोना काळात महत्त्वाची भूमिका निभावत असून व्यापार्यांना सर्वोतोपरी सुविधा देण्याच्या हेतुने वाणिज्य आणि परीचालन विभागाकडून व्यापार्यांसोबत वेळोवेळी संयुक्त बैठक घेतयेत असून त्या अनुषंगाने आजवर बांग्लादेशात माल गाडीद्वारे कांद्याची वाहतूक केली जात आहे.

