चुंचाळेत 42 वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या


यावल : तालुक्यातील साकळी-चुंचाळे रस्त्यावर एका 42 वर्षीय इसमाने गळफास घेवून आत्महत्य केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. जयसिंग विष्णु पाटील (रा.बोरखेडा बुद्रुक, हल्ली मुक्काम चुंचाळे) असे मयताचे नाव आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चुंचाळे, ता.यावल येथील समाधान भिका पाटील यांनी या प्रकरणी यावल पोलिसात खबर दिली. त्यांचे मेहूणे जयसिंग विष्णु पाटील (42) यांना दारू पिण्याचे व्यसन असल्याने गुरूवारी सकाळी ते शेतात कामाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले मात्र चुंचाळे फाट्याच्या रस्त्याने साकळी शिवारात रस्त्यास लागुन असलेल्या एका शेताच्या बांधावरील वृक्षाला रुमालाने त्यांनी गळफास घेतला. दारूच्या नशेत त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. तपास हवालदार अशोक जवरे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !