वरणगाव अग्निशमन दलाच्या कार्यालयाचे दरवाजे लांबवल्याप्रकरणी दोघांना अटक


वरणगाव : कठोरा रस्त्यावर वरणगाव नगरपालिकेच्या माध्यमातून फायर स्टेशन (अग्नीशमन) नवीन इमारतीचे बाधकाम करण्यात आल्यानंतर चोरट्यांनी तब्ब्ल 24 दरवाजे लांबवल्याचा प्रकार 10 जुलै रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणी बुधवारी दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली. प्रशांत सोपान चौधरी (20, झोपेवाडा) व जितेंद्र दयाराम भंगाळे (48 ,बढे वाडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून अटक
वरणगाव नगरपालिकेच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या कार्यालयासाठी इमारत उभारण्यात आली होती शिवाय या इमारतीला 24 लाकडी दरवाजे लावण्यात आले होते व चोरट्यांनी ही बाब हेरून 75 हजार रुपये किमतीचे दरवाजे तसेच सिध्देश्वरनगर शिवारातील नगरपरीषदेच्या घनकचरा प्रकल्पातून एक लाख रुपये किंमतीची 10 एचपी इलेक्ट्रीक मोटर लांबवली होती. वरणगाव नगरपालिका लेखापाल दौलत नरहरी गुट्टे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे व कर्मचार्‍यांनी गोपनीय माहितीवरून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयीतांनी नगरपालिकेचे दरवाजे चोरी करुन गावातच विक्री केल्याचे उघड झाले आहे. दरम्या., रावजीबुवा येथील लोखंडी जाळीची देखील चोरी झाली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !