भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार उत्साहात


भुसावळ : शहरातील दी भुसावळ पीपल्स चॅरीटेबल संस्थेच्या दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात गुरुवारी ‘चॅलेंजेस अ‍ॅडॅण्ड अपॉरच्युनिटीज इन अनऑरगनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड‘ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परीरषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांचे हस्ते झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. त्यांनी वेबिनारमध्ये सहभागी प्राध्यापकांना संबोधित केले.

देशभरातील संशोधक व प्राध्यापकांचा सहभाग
या राष्ट्रीय वेबिनरच्या प्रथम सत्रात आर.टी.एम नागपूर विद्यापीठातील सेवानिवृत्त झालेल्या वरीष्ठ प्रा.डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांनी तर द्वितीय सत्रात व्ही.बी.एस पूर्वांचल विद्यापीठ, जौनपुर (उत्तर प्रदेश) येथील व्यवस्थापन विद्याशाखेचे डीन प्रा.डॉ.अविनाश पाथर्डीकर यांनी चॅलेंजेस अ‍ॅड अपॉरच्युनीटीज इन अनऑरगनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा या विषयावर सखोल संशोधनातमक व्याख्याने देऊन उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. समारोप सत्रात प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी उपस्थितांना संबोधित केले. भोळे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र आणि वाणिज्य विद्या शाखेच्या विषयांनी सामायीकरीत्या आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये सत्र चेअरमन म्हणून भुसावळ येथील भोळे महाविद्यालयातील प्रा.अंजली पाटील यांनी काम पाहिले. समारोप सत्रात प्रातिनिधीक मनोगत प्रा.डॉ.विजयकुमार वानखेडे (जळगाव) आणि प्रा.विनोदकुमार पठाडे (नाशिक) यांनी सादर केले. वेबिनारमध्ये देशभरातून 425 संशोधक आणि प्राध्यापक सहभागी झाले होते.

यांनी घेतले परीश्रम
वेबिनार आयोजनासाठी कन्व्हेनेर म्हणून प्रा.डॉ.आर एम सरोदे , सह आयोजक म्हणून प्रा.डॉ.जयश्री सरोदे, समन्वयक म्हणून प्रा.संगीता धर्माधिकारी तर आयोजन सचिव म्हणून प्रा.डॉ.दयाधन एस.राणे यांच्यासह प्रा.दीपककुमार जैस्वार, प्रा.अंजली पाटील, प्रा.माधुरी पाटील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतल्याचे आयोजक समिती सचिव प्रा.डॉ.दयाघन राणे व प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय डी.चौधरी कळवतात.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !