वरणगावात भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध
भाजपा नेते व्यंकय्या नायडूंविरोधात निदर्शने
वरणगाव : भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे वरणगाव येथील बसस्थानक चौकात काळ्या फिती लावून भाजप नेत्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी राजांचे नाव यापुढे राज्यसभेत घेऊ नये, हे तुमचे घर नाही तर माझे चेंबर, असे खडे बोल खासदार उदयनराजे भोसले यांना शपथविधी वेळी सुनावनार्या भाजपा नेते व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात शिवसेनेतर्फे काळ्या फिती लावून घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. वरणगाव पोलिसांना याबाबत निवेदनही देण्यात आले. प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, भुसावळ पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, आबा सोनार, निलेश सुरडकर, निलेश ठाकूर, अतुल पाटील, निखील चौधरी, कैलास पाटील, सागर वंजारी, राहुल बावणे, विजय कुंभार, शिवाजी चव्हाण, पंकज पाटील, साईचरण चौधरी, निखील चौधरी, मंगेश चव्हाण, प्रतीक मराठे, देवा भाई यांच्यासह शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

