उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या कृतीचा यावल शिवसेनेतर्फे निषेध
यावल : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याने यावल तालुका शिवसेनेतर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावल तहसीलदार यांना लेखी निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली.
कारवाईबाबत यावल तहसीलदारांना निवेदन
गुरुवारी यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याकडे यावल तालुका शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी निवेदन दिले. राज्यसभेत शपथविधी सोहळा कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले हे शपथ घेत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण म्हणून जय भवानी, जय शिवाजी असे बोलत असताना राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना रोखून असे म्हणू नका, म्हणून समज दिली. हा प्रकार म्हणजे उपराष्ट्रपतींनी महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता असलेले श्री छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार सांडूसिंग पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र पौलाद सोनवणे, शहर प्रमुख जगदीश रत्नाकर कवडीवाले, तालुका संघटक गोपाळ लोटन चौधरी, तालुका उपप्रमुख शरद कोळी, विभाग प्रमुख भाऊसाहेब धनगर, शहर उपप्रमुख संतोष धोबी, उपतालुका संघटक पप्पू जोशी, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, शहर उपप्रमुख योगेश चौधरी, विभाग प्रमुख योगेश राजपूत, आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी, सरचिटणीस युवा सेना विजय पंडित, उपशहर प्रमुख युवा सेना पिंटू कुंभार, युवा सेना यावल शहर समन्वयक सागर बोरसे, युवा सेना उपशहरप्रमुख प्रवीण बडगुजर, उपशहर प्रमुख निलेश पराशर, उपशहर प्रमुख मोसिम खान, शहर उपप्रमुख जितू फालक, गोकुळ आबा कोळी आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.

