हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले


भुसावळ : हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे शुक्रवारी दुपारी एक वाजता हतनूर धरणाचे 24 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बर्‍हाणपूर, देडतलाई, टेक्सा यासह अन्य भागांमध्ये पाऊस सुरू असल्याने धरणात सातत्याने पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे दरवाजे सातत्याने उघडले जात आहे. शुक्रवार, 24 रोजी दुपारी एक वाजेच्या 24 दरवाजे उघडून तापी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणातून प्रति सेकंद 576 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत असून धरणाची जलपातळी 209.580 मीटर तर जलसाठा 181.60 एमएम क्यूब इतका आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !