प्रा.डॉ.डी.एम ललवाणी यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हा सल्लागारपदी निवड
भुसावळ : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य, आजादी बचाव आंदोलनाचे माजी राज्य संयोजक, जैन सोशल ग्रुपचे माजी सल्लागार ,अखिल भारतीय माहिती अधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष तसेच अनेक मान्यताप्राप्त संघटनेत प्रमुख सल्लागारपदी जबाबदारी घेऊन काम करीत असलेले प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. पुरोगामी पत्रकार संघाचे विनोद पवार, कोअर कमिटी प्रदेशाध्यक्ष यांनी निवड केली आहे. पुरोगामी पत्रकार संघ पदाधिकारी, ज्ञानासह मनोरंजन ग्रुप, पांडव ग्रुप, बेस्ट फॉईव्ह, मित्र परीवार, समाजबांधव व आप्तस्वकीयांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

