येवतीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बोदवड : तालुक्यातील येवती येथील 40 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. रामप्रसाद तुळशीराम बावस्कर (40) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी आनंदा दामू बावस्कर (54) यांनी बोदवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास बावस्कर यांनी घरातील छताला असलेल्या लोखंडी पाईपला गळफास घेतला. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तपास पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत.

