नागरीकांना दिलासा : उद्यापासून नो व्हेईकल झोन होणार बंद
जळगाव : जिल्हाधिकार्यांनी जळगाव शहरासह भुसावळ व अमळनेर या या शहरातील ‘नो व्हेईकल झोन’ सोमवारपासून हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. एकाच मार्गावर नागरीकांची होत असलेली गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे आदेश शनिवारी जिल्हाधिकार्यांनी काढले आहेत. यामुळे नागरीकांना जळगावसह भुसावळ व अमळनेर शहरातील विविध भागात मुक्तपणे संचार करता येणार आहे. नागरी जीवन पूर्वपदावर येण्यास यामुळे सुरुवात मदत होणार आहे. दरम्यान, नो व्हेईकल झोनमध्ये पत्रे लावून रस्ते अडविले गेल्याने नागरीकांसह व्यापार्यांनाही मोठा त्रास सोसावा लागत होता.

