प्रभागातील नागरीकांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या काढ्याचे वाटप
भुसावळातील नगरसेवक पिंटू ठाकूर यांचे दातृत्व
भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकारक शक्ती वाढवणार्या काढ्याचे शहरातील प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्यातर्फे प्रभागातील नागरीकांना करण्यात आले. ठाकूर यांनी स्वखर्चातून आयुर्वेदिक औषधीयुक्त आयुष्मान काढ्याचे घरोघरी जावून नागरीकांना वाटप केले. शहरात सातत्याने कोरोनाचा फैलाव वाढत असून अशा परीस्थितीत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या काढ्याची मोठी मदत होणार आहे. या काढ्यामुळे पावसाळ्यात होणार्या साथीच्या आजारांपासून बचाव देखील होणार आहे. प्रभागातील दीनदयाल नगर, लेंडीपुरा, मस्जिद वाली गल्ली, अशोक नगर, गोरक्षण, श्रीहरी नगर, दत्त नगर, म्हाडा कॉलनी, हुडको कॉलनी, साई कॉलनी या भागातील नागरीकांना काढा वाटप करण्यात आला.

