सरकारे पाडणार्या भाजपाचा भुसावळात निषेध
सत्तेचा गैरवापर करून सरकार पाडण्याची हुकुमशाही मोदी सरकारने थांबवण्याची भुसावळसह मुक्ताईनगर व यावलमध्ये मागणी
भुसावळ : विविध राज्यांतील स्थिर सरकार अस्थिर करणार्या लोकशाही विरोधी मोदी सरकार अर्थात भाजपा सरकारचा भुसावळ विभागात सोमवारी निषेध करण्यात आला. भुसावळात या संदर्भात तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मोदी सरकार ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहेत ते अस्थिर करून येनकेन प्रकारे ती सरकारे पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे भाजपा सरकारचा जाहीर निषेध
भुसावळ- विविध राज्यांतील स्थिर सरकार अस्थिर करणार्या लोकशाही विरोधी मोदी सरकार अर्थात भाजपा सरकारचा भुसावळ शहर काँग्रेस कमिटी तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. मोदी सरकार ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहेत ते अस्थिर करून येनकेन प्रकारे ती सरकारे पाडण्याचा डाव सुरू केल्याच्या प्रकाराचा तहसीलदार दीपक धीवरे यांना निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला.
हुकूमशाही थांबवण्याची अपेक्षा
हुकुमशाही मोदी सरकारने कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश या सारख्या राज्यामधील लोकनियुक्त काँग्रेस सरकारे पैसा व बळाच्या जोरावर पाडली असून त्याठिकाणी भाजपा विचारांचे किंबहुना भाजपा सरकार त्या ठिकाणी स्थापन करीत असल्याने हा प्रकार म्हणजे घटना विरोधी आहे. या प्रकाराचा भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. लोकशाहीचे हुकूम शाहीत परीवर्तन करून लोकशाहीची गळचेपी केली जात असून राजस्थानमध्ये ही लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सुरू असून आमदारांची पळवापळवी सुरू आहे. सत्तेचा गैरवापर करून लोकनियुक्त सरकार पाडणे हुकुमशाही मोदी सरकारने थांबवावे, अशी मागणी भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी भुसावळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, प्रदेश संयोजक भगवान मेढे, तालुका सरचिटणीस राजेंद्र श्रीनाथ, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, सागर कुरेशी, महेंद्र महाले, रवींद्र साळवे, सुरेश महाजन, मुकुंदा नामदास, विलास खरात, सुकदेव सोनवणे, सुनील दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी.कोटेचा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

