यावलमध्ये काँग्रेसतर्फे नायब तहसीलदारांना निवेदन


मोदी सरकारच्या रणनीतीचा नोंदवला निषेध

यावल : यावल काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार ज्या-ज्या राज्यांमध्ये त्यांचे सरकार नाहीत त्या ठिकाणी असलेले स्थिर शासन अस्थिर करून पाडण्यासाठी लोकशाहीविरोधी कृत करीत असल्याचा आरोप करीत जिल्हा परीषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे मार्गदर्शनाखाली येथील निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अनुसूचित जाती विभागाच्या काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, मोहम्मद खान, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, यावल तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शहा, यावल शेतकी संघाचे संचालक अमोल भिरूड, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, नावरे सरपंच समाधान धनसिंग पाटील, खलील शहा, कादर शहा (किनगाव), शेख नईम शेख शरीफ, जलील सत्तार पटेल (जिल्हा अध्यक्ष काँग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशन), पुंडलिक बाजीराव बारी आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !