साकळीत कोरोना वीर पुरस्कारांचे वितरण !


आशा वर्कर यांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसाचे वाटप

यावल : गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोना आजाराच्या जागतिक महामारीने थैमान घातले असल्याने सर्वत्र आपत्कालीन परीस्थिती निर्माण झालेली आहे. तथापि कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वतःच्या जीवाची बाजी लावून लोकहितासाठी सर्वच कोरोना योध्दे लढत आहे. ही सर्व परीस्थिती लक्षात घेता जळगाव जिल्हा परीषदेचे शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांच्या 46 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, 26 रोजी त्यांच्या हितचिंतक व मित्रपरीवाराकडून कोरोना योद्ध्यांना समर्पित अशा पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या लोकहिताच्या या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा होती.

कोरोना योद्ध्यांचा सन्मान
सभापती रवींद्र पाटील वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, 26 रोजी जि.प.सभापती रवींद्र पाटील मित्रपरीवार व कै.चंद्रभान आप्पा प्रतिष्ठानतर्फे भवानी माता म्हणून कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात कोरोना आजाराविरुद्धच्या लढाईत साकळी-दहिगाव गटातील आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत, पोलिस, होमगार्ड, प्रसिद्धीमाध्यमे या सर्व विभागातील कर्मचारी व पत्रकार तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका या सर्वांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपण स्वतः काळजी घेत समाजाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी दिवस-रात्र अविरत सेवा बजावली. त्याबद्दल या सर्व कर्मचार्‍यांना कै.अण्णासो सूर्यभान हिरामण पाटील व कै.आप्पासो चंद्रभान हिरामण पाटील यांचे स्मरणार्थ कोरोना वीर-2020 या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर, गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.हेमंत बर्‍हाटे, पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, साकळीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले, जि.प.सभापती रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.सूर्यभान आण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कोरोना योध्दांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. कार्यक्रमास गावातील पदाधिकारी व हितचिंतक नागरीक उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक संजय पाटील व श्याम पाटील यांनी केले. या दिवशी सायंकाळी यावल येथे सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते यावल येथील सर्व तालुका पत्रकार प्रतिनिधींचा ’कोरोना वीर-2020’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !