जळगावात गाय चोरीच्या प्रयत्नातील एकास अटक


जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी दारासमोर बांधलेली गाय चोरीच्या प्रयत्नात असलेल्या संशयीत आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. परवेज शेख युसुफ (20, रा.अशोक किराणा जवळ, रामेश्वर कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पंढरी कोंडू पवार (55, रा.अशोक किराणा चौक) यांच्या घराच्या समोर त्यांनी गाय बांधली असता 26 जुलै रोजी रात्री 9 ते 9.30 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी हा अंधाराचा फायदा घेत बांधलेली गाय चोरून नेत असतांना एमआयडीसी पोलीस कर्मचारी हेमंत कळसकर, योगेश बारी, चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, मुकेश पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपीस अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !