भुसावळात जनसेवेकर्यांचा कोरोना कर्मवीर पुरस्काराने गौरव
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळने सन्मानपत्र देवून वाढवले मनोबल
भुसावळ : कोरोना महामारीच्या काळात अहोरात्र जनतेसाठी झटणार्या व सेवा देणार्या सेवेकर्यांचा इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे ‘कोरोना कर्मवीर’ पुरस्काराने सोमवारी गौरव करण्यात आला. कोरोनाच्या कठीण काळात तन, मन धनासह अहोरात्र सेवा देवून कार्य करणार्या दानशूरांचा शहरातील भिरुड हॉस्पिटल समोरील प्राची बंगल्यात सोमवारी सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमात सोशल डिस्टन्सचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.
यांचा झाला सन्मान
सत्कारार्थीमध्ये नगसेवक पिंटू कोठारी, भुसावळ नगरपालिका दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.संदीप जैन, गोदावरी हॉस्पिटलच्या डॉ.शीतल ढाके, नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, वृक्षमित्र प्रमोद शुक्ला, तसेच रेल्वे हॉस्पिटल मधील आयइसोलेशन वॉर्डमधील 10 नर्सेस यांचा वृक्ष रोप, सन्मानपत्र व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन अध्यक्षा शीतल भराडे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा तसेच इनरव्हील क्लब भुसावळच्या पास्ट प्रेसिडेंट रजनी सावकारे होत्या. प्रमुख पाहुणे राधेश्याम लाहोटी होते तर आयोजक यांनी गर्दी टाळून आयोजित कार्यक्रमात काही सत्कार केले तर काही सत्कारार्थीचे सत्कार घरी जाऊन केले.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
इनरव्हील क्लबतर्फे जामनेर रोडवरील दुभाजकांमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमाला बी.ए.लाहोटी चॅरीटेबल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले. प्रसंगी प्रेसिडेंट शीतल भराडे, सेक्रेटरी रूचीका शर्मा, ट्रेझरर कंचन जोशी, रजनी सावकारे उपस्थित होते. पास्ट प्रेसिडेंट आरती चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी इनरव्हील क्लब अध्यक्षा शीतल भराडे यांनी मनोगत व्यक्त करून आभारही मानले.

