बकरी ईद व कुर्बाणीच्या आदेशात सरकारने बदल करवा


ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनची प्रांताधिकार्‍यांकडे मागणी

भुसावळ : बकरी ईद निमित्त कुर्बाणी व ईदसाठी शासनाने काढलेल्या आदशात काही बदल करावा, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी निवेदनाद्वारे सोमवारी करण्यात आली. भुसावळातही प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन सादर करण्यात आले.

नमाजाला परवानगी देण्याची मागणी
निवेदनाचा आशय असा की, प्रतिकारात्मक कुर्बाणी करणे शक्य नाही आणि असा अध्यादेश काढून सरकारने मुस्लीम बांधवांचे मन दुखावल्याने प्रतिकारात्मक कुर्बाणी हा शब्द वगळण्यात यावा कुर्बाणीसाठी लागणारे जनावरांचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ठराविक जागेवर स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात यावी, बकरी ईद नमाज साठी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून आणि सॅनिटायझरचे व्यवस्था करून स्वतः च्या जायनमाज (नमाज पठण साठी कापड) सोबत घेऊन ईदगाह आणि मशीदमध्ये ईदची नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी जनतेच्या वीज बिल माफीसाठी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

यांची होती उपस्थिती
प्रांताधिकार्‍यांना निवेदन देताना पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांच्यासह तालुकाध्यक्ष अशरफ तडवी, शहराध्यक्ष शोएब बागवान, जिल्हा महासचिव कलीम शेख, युवा जिल्हाध्यक्ष नावेद खान, खडका टीमचे शोएब शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !