कोटेचा महिला महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
भुसावळ : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविड 19 चा प्रादूर्भाव लक्षात घेता तसेच युजीसी महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ यांच्या संदर्भिय मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कनिष्ठ आणि वरीष्ठ महाविद्यालयीन वर्गांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
या वर्गांसाठी ऑनलाईन प्रवेश
महाविद्यालयात अकरावी व बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच वरीष्ठ महाविद्यालयातील एफ.वाय., एस.वाय. व टी.वाय. कला, वाणिज्य आणि विज्ञान आदी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देवून प्रवेश निश्चित करावा तसेच कोविडचा प्रादुर्भाव संपत नाही तो पर्यंत 1 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन टीचिंग क्लास सुरू करण्यात येणार असल्याने त्याचा लाभ घ्यावा तसेच आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चीत करावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा यांनी केले आहे.

